फुटबॉलपटू रोनाल्डोच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...

'अलाना मार्तिनचा आताच जन्म झाला. जियो आणि अलाना दोघीही उत्तम आहेत. आम्ही खूप खूश आहोत..'

फुटबॉलपटू रोनाल्डोच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...

माद्रिद (स्पेन) : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो चौथ्यांदा बाबा झाला आहे. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रौद्रिगेजने मुलीला जन्म दिला आहे. रोनाल्डो आणि जार्जिनानं अद्यापही लग्न केलेलं नाही.

आपण चौथ्यांदा बाबा झाल्याचं स्वत: रोनाल्डोनं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.

'अलाना मार्तिनचा आताच जन्म झाला. जियो आणि अलाना दोघीही उत्तम आहेत. आम्ही खूप खूश आहोत..' असं ट्वीट रोनाल्डोनं केलं आहे.

https://twitter.com/Cristiano/status/929807173806448646

मुलीच्या जन्मावेळी रोनाल्डो तिथे उपस्थित होता. त्यासाठी त्याने आपल्या कोचची परवानगीही घेतली होती. दरम्यान, याआधी रोनाल्डो आणि जार्जिना यांना गेल्या वर्षी जून महिन्यात जुळी मुलं झाली होती. तसंच त्यांना याआधी क्रिस्टियानो ज्युनिअर हा सात वर्षाचा मुलगा देखील आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cristiano ronaldo becomes father latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV