विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

कधी काळी विराटला लग्नासाठी मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटर डॅनियल वेट हिने या नव्या जोडप्याला अवघ्या एका शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

मुंबई : इटलीत विराट आणि अनुष्काचं शाही लग्न पार पडल्यानंतर अनेक तरुण-तरुणीचा हिरमोडही झाला. त्यातही टीम इंडियाचा कर्णधार आणि हॅण्डसम हंक विराट कोहलीवर तर अनेक तरुणींचा जीव जडला होता. स्टेडियममध्ये देखील अनेक तरुणी 'विराट Marry Me'पोस्टर घेऊन यायचा. अनेकदा ती दृश्यं टीव्ही पाहायला देखील मिळायची.

असं असलं तरीही विराटनं आपली जोडीदार आधीच निवडली होती आणि काल तो तिच्यासोबत लग्नबंधनात अडकला देखील. पण त्यामुळे अनेक तरुणींचा हिरमोड झाला. त्यातच विराटच्या एक चाहतीचा देखील समावेश आहे.

कधी काळी विराटला लग्नासाठी मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटर डॅनियल वेट हिने या नव्या जोडप्याला अवघ्या एका शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.इंग्लंडची डॅनियल वेट ही देखील विराटसारखीच मैदानावर क्रिकेट खेळते. ती विराटची प्रचंड मोठी फॅन आहे. जवळजवळ तीन वर्ष आधी इंग्लंड महिला क्रिकेट संघाची खेळाडू डॅनियलनं विराटला प्रपोज केलं होतं. पण त्याआधी विराटनं आपलं हृदय अनुष्काला दिलं होतं.

डॅनियलनं थेट ट्विटरवरून विराटला लग्नाची मागणी घातली होती. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यानं डॅनियल वेटची भेटही घेतली होती. पण एक मोठी चाहती म्हणून विराटनं तिला भेट दिली होती.

संबंधित बातम्या :

विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?

पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा
VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: danielle wyatt wishes virat kohli after his wedding latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV