वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक, घटना सीसीटीव्हीत कैद

डरबन कसोटीच्या चौथ्या दिवशी टी-ब्रेकमध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विटन डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक, घटना सीसीटीव्हीत कैद

डरबन : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ पहिली कसोटी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण डरबन कसोटीच्या चौथ्या दिवशी टी-ब्रेकमध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विटन डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना डेव्हिड वॉर्नर डी कॉकवर प्रंचड चिडलेला होता. पण यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा वॉर्नरला समजवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू वॉर्नरला शांत करण्याच प्रयत्न करत होते. सुरुवातीला उस्मान ख्वाजा नंतर टीम पेन आणि शेवटी स्मिथ वॉर्नरला पुढे घेऊन जात असल्याचं  या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पण वॉर्नर एवढा चिडला होता की, तो परत मागे फिरुन-फिरुन डी कॉकला बडबडत होता. वाद जास्त चिघळू नये यासाठी द. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डूप्लेसीनेही यावेळी मध्यस्थी केली. दरम्यान,  यावेळी डी कॉक मात्र शांत होता.डरबन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीलाच आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. त्यानंतर अनुभवी एबी डिव्हिलिअर्स फलंदाजीसाठी मैदानावर आला. पण यावेळी तो शून्यावर रनआऊट झाला. तेव्हा वॉर्नरने अतिशय आक्रमकपणे आपला आनंद साजरा केला. यावेळी तो डिव्हिलिअर्सला देखील काही तरी बडबडला.

त्यानंतर डीकॉक आणि मार्करमने शानदार भागीदारी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानावर बरंच स्लेजिंगही पाहायला मिळालं. याचदरम्यान, मार्करमने खणखणीत शतकही झळकावलं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत मॅच रेफ्री जेफ क्रो हे चौकशी करु शकतात. आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही खेळाडू बाद झाल्यानंतर त्याला डिवचण्यासारखं कृत्य प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला करता येत नाही.

या सामन्यात विजयापासून ऑस्ट्रेलिया फक्त एका विकेटने दूर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अजूनही 124 धावा हव्या आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: david warner and De Kock verbal exchange in dressing room latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV