डेव्हिड मिलरचं टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक

रिचर्ड लेव्हीने न्यूझीलंडविरुद्ध 2012 साली 45 चेंडूत केलेल्या वेगवान शतकाचा विक्रमही त्याने मोडला.

डेव्हिड मिलरचं टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध 35 धावात शतक ठोकत टी-20 मध्ये सर्वात शतक ठोकण्याचा विक्रम केला. मिलरने 36 चेंडूंमध्ये सात चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. रिचर्ड लेव्हीने न्यूझीलंडविरुद्ध 2012 साली 45 चेंडूत केलेल्या वेगवान शतकाचा विक्रमही त्याने मोडला.

टी-20 क्रिकेटमध्ये हे सर्वात वेगवान तिसरं शतक आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना 30 चेंडूतच शतक ठोकलं होतं. तर अँड्रूय सायमंडने 2004 साली केंटकडून खेळताना 34 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं होतं.

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 38 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम डेव्हिड मिलरच्या नावावर आहे. मिलर टी -20 क्रिकेटमधील पहिलाच असा फलंदाज आहे, ज्याने दोन्हीही स्तरावर खेळताना 40 पेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक ठोकलं आहे.

युवराजचा विक्रम थोडक्यात हुकला

मिलरने पहिल्या 50 धावा 23 चेंडूत पूर्ण केल्या. मात्र पुढील 50 धावा त्याने केवळ 12 चेंडूंमध्येच ठोकल्या.     19 व्या षटकात मिलरने पाच चेंडूंमध्ये पाच षटकार ठोकले. मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार ठोकता न आल्यामुळे तो युवराजचा सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकण्याच्या विक्रमापासून दूर राहिला.

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकाच षटकात पाच षटकार ठोकणारा तो जगातला दुसरा फलंदाज आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या एव्हिन ल्युईसने हा विक्रम केला होता.

मिलरच्या या वादळी खेळीने दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटच्या मोबदल्यात 224 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 141 धावांमध्येच आटोपला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Devid miller’s fastest t20 hundr
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV