गांगुलीने त्याग केला म्हणून धोनी मोठा खेळाडू झाला : सेहवाग

गांगुलीने कर्णधार असताना धोनीला संधी दिली नसती तर तो मोठा खेळाडू होऊ शकला नसता, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

गांगुलीने त्याग केला म्हणून धोनी मोठा खेळाडू झाला : सेहवाग

रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे. धोनी आज जिथे आहे, त्यामागे सौरव गांगुलीचा त्याग आहे, असं सेहवागने म्हटलं आहे.

‘’तिसऱ्या क्रमांकावर नवीन खेळाडूंना संधी द्यायची, असा प्लॅन कर्णधार असताना सौरव गांगुलीने तयार केला होता. सौरव गांगुली स्वतः सलामीला फलंदाजी करायचा. मात्र माझ्यासाठी त्याने ती जागा सोडली. त्याचप्रमाणे 2005 साली गांगुलीने विशाखापट्टणम वन डेत तिसऱ्या क्रमांकावर धोनीला पाठवण्याचा निर्णय घेतला’’, अशी माहिती सेहवागने दिली.

‘’स्वतःची सेट जागा सोडणारे आणि नव्या खेळाडूला संधी देणारे खुप कमी कर्णधार असतात. दादा नसता तर धोनी मोठा खेळाडू होऊ शकला नसता. दादाने नेहमी नवीन खेळाडूंना संधी दिली’’, असंही सेहवाग म्हणाला.

5 एप्रिल 2005 रोजी झालेल्या विशाखापट्टणम वन डेत धोनीने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 148 धावा केल्या होता. त्यानंतर धोनी स्फोटक खेळाडू म्हणून पुढे आला. ही त्याची दुसरी सर्वाधिक धावसंख्या होती. त्यापूर्वी धोनीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा ठोकल्या होत्या.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV