...म्हणून धोनीनं आपले लांब केस कापले होते?

धोनीच्या त्या लूकचे अनेक चाहते होते. पण अचानकपणे त्यानं आपला लूकमध्ये बदल करत केस कापून टाकले होते. त्यावेळी धोनीचे अनेक चाहते नाराज झाले होते.

...म्हणून धोनीनं आपले लांब केस कापले होते?

मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या अफेअरीच मीडियात बरीच चर्चा होती. पण दोघांपैकी कुणीही याबाबत कधीच उघडपणे वक्तव्य केलेलं नव्हतं.

मात्र, याचदरम्यान धोनीनं आपली ओळख असलेले लांब केसही कापले होते. दीपिकाला धोनीचे लांब केस आवडत नसल्यानं त्याने ते कापले होते. असंही त्यावेळी म्हटलं जात होतं.

धोनीच्या त्या लूकचे अनेक चाहते होते. पण अचानकपणे त्यानं आपला लूकमध्ये बदल करत केस कापून टाकले होते. त्यावेळी धोनीचे अनेक चाहते नाराज झाले होते.

2007 साली टी-20 विश्वचषकासाठी धोनीच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. धोनीनंही हा निर्णय सार्थ ठरवत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देत पहिलाच टी-20 विश्वचषक पटकावला होता. योगायोगानं त्याच वर्षी दीपिकानंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्याचदरम्यान, धोनी आणि दीपिकाबद्दल बरंच गॉसिप सुरु झालं होतं. तेव्हा धोनीही दीपिकाला आपले क्रिकेट सामने पाहण्यासाठी निमंत्रित करायचा. दरम्यान, असं म्हटलं जातं की, धोनीनं एकदा कबूलही केलं होतं की, दीपिका तिचं क्रश होती. त्यामुळे धोनीनं तिच्याच सांगण्यावरुन आपले केस कापल्याची चर्चा त्यावेळी होती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV