धावण्याचं आव्हान देणाऱ्या पंड्यावर धोनीची मात

सराव सत्रादरम्यान दोघांमध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा झाली, ज्यामध्ये 36 वर्षीय धोनीने पंड्यावरही मात केली.

धावण्याचं आव्हान देणाऱ्या पंड्यावर धोनीची मात

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी आणि ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यात वेगळाच सामना पाहायला मिळाला. सराव सत्रादरम्यान दोघांमध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा झाली, ज्यामध्ये 36 वर्षीय धोनीने पंड्यावरही मात केली.

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र तो या टीकेला शब्दाने उत्तर न देता थेट मैदानातूनच उत्तर देतो. त्याची स्टम्पिंग करण्याची शैली असो किंवा झेल पकडणं असो, या सर्वांमध्ये आजही त्याच चपळाईने खेळताना दिसतो.

सराव सत्रादरम्यानही अशीच झलक त्याने दाखवली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 24 वर्षीय हार्दिक पंड्याला त्याने मागे टाकलं. दरम्यान यापूर्वीही तो टीम इंडियाच्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये टॉप खेळाडूंमध्ये होता. युवा खेळाडूंपेक्षाही जास्त गुण धोनीला मिळाले होते.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेतही धोनीने कठीण परिस्थितीत दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dhoni won 100 meter race against pandya
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV