धोनी वयाच्या 36 व्या वर्षी 26 वर्षाच्या खेळाडूवर भारी : रवी शास्त्री

त्याच्या वयाच्या 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूवरही धोनी भारी आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

धोनी वयाच्या 36 व्या वर्षी 26 वर्षाच्या खेळाडूवर भारी : रवी शास्त्री

मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या वयावरुन टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याच्या वयाच्या 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूवरही धोनी भारी आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

''धोनीसारखा फिट खेळाडू सध्या संघात नाही. टीकाकारांनी त्याच्या वयाकडे पाहण्याऐवजी कारकीर्दीकडे पाहावं'', असा सल्लाही रवी शास्त्रींनी दिला. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या वयावरुन त्याच्यावर नेहमी टीका केली जाते. त्यालाच उत्तर देताना रवी शास्त्रींनी टीकाकारांचा समाचार घेतला.

''मी गेल्या 30-40 वर्षांपासून क्रिकेटला जवळून पाहिलंय. विराटही गेल्या दहा वर्षांपासून भारतीय संघाचा एक भाग आहे. आम्हाला चांगलं माहितीय की, धोनी या वयातही 26 वर्षाच्या खेळाडूवरही भारी भरु शकतो. त्याची बरोबरी करणारं सध्या कुणीही नाही'', असं रवी शास्त्री म्हणाले.

दरम्यान, धोनी 2019 च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघात असेल, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही स्पष्ट केलं. धोनीचा पर्याय म्हणून ज्या खेळाडूंना संधी देण्यात आली, ते त्याच्या जवळही नाहीत, असं एमएसके प्रसाद म्हणाले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dhoni’s fitness is better than 26 years players
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV