क्रिकेटर बनण्याआधी युवराज सिंहने 'या' सिनेमात काम केलंय!

क्रिकेटर बनण्याआधी युवराज सिंहने 'या' सिनेमात काम केलंय!

मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंहला अनेक जण सिक्सर किंग म्हणून ओळखतात. इतकंच नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारालाही मात दिली.

पण तुम्हाला माहित आहे का, युवराजने सिनेमातही काम केलं आहे. लहान असताना युवराजने अभिनेता आणि गायक हंस राज हंस यांच्यासोबत पंजाबी सिनेमा 'मेहंदी शगना दी' काम केलं होतं.

हा सिनेमा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी युवराजचं वय 11 वर्ष होतं. फिल्म हिस्ट्री पिक्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवर युवराजने काम केलेल्या सिनेमातील फोटो शेअर केले आहेत.

https://twitter.com/FilmHistoryPic/status/876388701013770240

कदाचित सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांच्याप्रमाणे त्याच्या आयुष्यावरही चित्रपट बनेल आणि त्यात आपल्याला हा किस्सा पाहायला मिळेल.

युवराजने मागील वर्षी अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केलं होतं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV