इंग्लंडनं पटकावला अंडर-17 फिफा विश्वचषक, स्पेनवर 5-2नं मात

इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा पराभव करून, अंडर-17 फिफा विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.

इंग्लंडनं पटकावला अंडर-17 फिफा विश्वचषक, स्पेनवर 5-2नं मात

कोलकाता : इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा पराभव करून, अंडर-17 फिफा विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. स्पेनला या विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सर्जिओ गोमेझनं १०व्या आणि ३१व्या मिनिटाला एकेक गोल डागून स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण रियान ब्रूस्टरनं ४४व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं इंग्लंडला या सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. मग उत्तरार्धात मॉर्गन गिब्स व्हाईटनं ५८व्या इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर फिलिप फोडेननं ६९व्या आणि ८८व्या मिनिटाला, तर मार्क गिहीनं ८४व्या मिनिटाला केलेल्या गोल्सनी इंग्लंडला ५-२ असा शानदार विजय मिळवून दिला.

स्पेननं याच वर्षी इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करून अंडर सेव्हन्टिन युरोपियन विजेतेपद पटकावलं होतं. इंग्लंडनं अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्या पराभवाचा वचपा काढला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: England beat Spain 5-2 in Under 17 fifa World Cup final
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV