पार्टनरला श्रेय देण्याची रोहितची जुनी सवय : एक्स गर्लफ्रेण्ड

आपल्या यशाचं श्रेय पार्टनरला देण्याची जुनी सवय रोहितला आहे. मी त्याच्या आयुष्यात असताना तो मला क्रेडीट द्यायचा, असं एक्स गर्लफ्रेण्ड सोफिया हयात म्हणाली.

पार्टनरला श्रेय देण्याची रोहितची जुनी सवय : एक्स गर्लफ्रेण्ड

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गेल्या आठवड्यात तिसरं द्विशतक झळकवून श्रीलंकेविरुद्धची मॅच खिशात घातली. रोहितच्या लग्नाच्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला ही मॅच झाली होती, त्यामुळे ही डबल सेंच्युरी त्याने पत्नी रितीकाला समर्पित केली. मात्र रोहितची एक्स गर्लफ्रेण्ड, मॉडेल सोफिया हयातने त्याच्या आनंदावर विरजण घातलं आहे.

'रोहितला मिळालेल्या यशाचा मला आनंदच आहे. पण आपल्या यशाचं श्रेय पार्टनरला देण्याची जुनी सवय रोहितला आहे. मी त्याच्या आयुष्यात असताना तो मला क्रेडीट द्यायचा. पण जेव्हा त्याची कामगिरी सुमार व्हायची, तेव्हा मी रडायचेही. पण माझ्यावरचं प्रेम विसरायला लावणारं कोणीतरी त्याला भेटलं, याचा मला आनंद आहे.' असं सोफिया म्हणाली.

रोहित शर्माचे हे तीन मोठे विक्रम हुकले!


'रोहितच्या यशाचं मला कौतुकच आहे, पण लैंगिक भेदभाव चुकीचा आहे. रोहित पुरुष आहे म्हणून सगळे टाळ्या वाजवत आहेत. जेव्हा अपंग कांचनमाला पांडेने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली, तेव्हा कोणी वेडंपिसं झालं नाही. तिचं यश जास्त कौतुकास्पद होतं.' असं मत सोफियाने व्यक्त केलं.

रोहितचं बायकोला द्विशतकाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट!


रोहितच्या यशापेक्षा एखाद्या सामाजिक कार्याचं मी सेलिब्रेशन करेन, असंही सोफियाने सांगितलं.

रोहित शर्मा आणि रितीका सजदेह यांचा विवाह 13 डिसेंबर 2015 रोजी झाला होता. यावर्षी 13 डिसेंबरला रोहितने 153 चेंडूत 208 धावा ठोकून भारताला श्रीलंकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच जिंकून दिली. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिकेत 2-1 ने विजय मिळाला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ex-girlfriend Sofia Hayat on Rohit Sharma’s double century credit to wife Ritika latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV