‘डिअर अंकल सचिन...’ अशी सुरुवात करत सचिनच्या या चिमुकल्या फॅनने पत्र लिहिलं आहे. अरमान असे या फॅनचे नाव आहे. सचिनसारखंच आपल्यालाही व्हायचं असल्याचे अरमानने म्हटले आहे. अरमानने हस्ताक्षरात हे पत्र लिहिले.
सचिन तेंडुलकरने ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करत, अरमानचे आभार मानले असून, त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सचिनने शुभेच्छा दिल्या.
अरमानने सचिनला उद्देशून लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
“डिअर अंकल सचिन, मी तुझा सिनेमा (सचिन : अ बिलिअन ड्रीम्स) पाहिला आणि मी खूप एन्जॉय केला. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. मला तुझ्यासारखं व्हायचंआहे. मला तुझ्यासारखं खेळून देशासाठी चषक जिंकायचं आहे. तुझी स्वाक्षरी असलेली बॅट मला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. तू दिलेलं बक्षीस माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आहे.”, असे अरमानने पत्रात म्हटले आहे.
Armaan, thank you so much for your endearing letter. Keep working hard, always. May all your dreams come true! #FanFriday #100MB pic.twitter.com/8sjFSjq55A
— sachin tendulkar (@sachin_rt) January 5, 2018