डोपिंगनंतर फ्रेन्च ओपनमध्ये शारापोव्हाला वाईल्ड कार्ड नाकारलं

By: | Last Updated: > Wednesday, 17 May 2017 11:50 PM
French Open does not extend wild- card entry to Maria Sharapova live update

मुंबई : रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाला फ्रेन्च ओपनमध्ये थेट वाईल्ड कार्डनं प्रवेश देण्यास आयोजकांनी नकार दिला आहे. फ्रेन्च टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष बर्नार्ड गिडीचेली यांनी शारापोव्हाची वाईल्ड कार्डची विनंती मान्य करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.

शारापोव्हानं 2012 आणि 2014 साली फ्रेन्च ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण वाईल्ड कार्ड हे दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना दिलं जातं, डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेल्या खेळाडूंना नाही, असंही गिडीचेली यांनी स्पष्ट केलं.

शारापोव्हा आणि तिच्या चाहत्यांची निराशा झाली असेल, पण तिच्यासाठी आम्ही कुठली तडजोड करु शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचं सेवन केल्याप्रकरणी 15 महिने बंदीचा कालावधी संपताच शारापोव्हानं गेल्या महिन्यात स्टुटगार्ट ओपनमधून पुनरागमन केलं होतं. पण ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी तिला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

फ्रेन्च ओपनसाठी वाईल्ड कार्ड नाकारलं गेल्यावर काही तासांतच मारिया शारापोव्हावर रोममधील टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेण्याची वेळ ओढवली.

रोम ओपनच्या दुसऱ्या फेरीत क्रोएशियाची दिग्गज टेनिसपटू मिर्याना लुसिच बारोनीवर शारापोव्हानं 4-6, 6-3, 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण डाव्या मांडीला झालेली दुखापत बळावल्यामुळे शारापोव्हाला हा सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे रोम ओपनची उपांत्य फेरी गाठून विम्बल्डनच्या मुख्य फेरीसाठी थेट पात्र ठरण्याची संधीही शारापोव्हानं गमावली आहे.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:French Open does not extend wild- card entry to Maria Sharapova live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गॉल कसोटीत पहिला दिवस भारताचा, धवननंतर पुजाराचीही शतकी खेळी
गॉल कसोटीत पहिला दिवस भारताचा, धवननंतर पुजाराचीही शतकी खेळी

गॉल : भारतीय फलंदाजांनी गॉल कसोटीचा पहिला दिवस गाजवला. सलामीवीर

INDvsSL: धवनची धडाकेबाज खेळी, द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं
INDvsSL: धवनची धडाकेबाज खेळी, द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं

गॉल (श्रीलंका): श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत भारताचा सलामीवीर

शानदार कामगिरी करणाऱ्या महिला संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत
शानदार कामगिरी करणाऱ्या महिला संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत

मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषकात उपविजेतेपद पटकावणारा भारतीय संघ

कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्ट!
कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्ट!

मुंबई: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा

प्रशिक्षक नियुक्ती वादावर कर्णधार कोहलीची प्रतिक्रिया
प्रशिक्षक नियुक्ती वादावर कर्णधार कोहलीची प्रतिक्रिया

गॉल (श्रीलंका) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक

स्पेशल रिपोर्ट : श्रीलंकेचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज
स्पेशल रिपोर्ट : श्रीलंकेचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई : विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगाना हेराथचा श्रीलंका संघ

6 चेंडूत 6 षटकार, फलंदाज रॉसची तुफानी फटकेबाजी
6 चेंडूत 6 षटकार, फलंदाज रॉसची तुफानी फटकेबाजी

हेडिंग्ले (इंग्लंड) : क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार असं म्हटलं तर

ऑस्ट्रेलियन खेळाडू बांगलादेश दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियन खेळाडू बांगलादेश दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता

सिडनी : ऑस्ट्रेलियाचे सीनियर खेळाडू आगामी बांगलादेश दौऱ्यावर

कोहली-कुंबळे वादावर आर. अश्विनची प्रतिक्रिया
कोहली-कुंबळे वादावर आर. अश्विनची प्रतिक्रिया

गॉल (श्रीलंका): टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं कर्णधार

मिताली राज ICC वन डे संघाची कर्णधार!
मिताली राज ICC वन डे संघाची कर्णधार!

लंडन : आयसीसीने सोमवारी महिला विश्वचषक 2017 चा संघ जाहीर केला आहे.