अनुष्का-विराटला देशद्रोही ठरवणाऱ्या नेत्याला गंभीरचं उत्तर

लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.

अनुष्का-विराटला देशद्रोही ठरवणाऱ्या नेत्याला गंभीरचं उत्तर

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीत लग्न केल्यामुळे त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजप आमदारावर क्रिकेटपटू गौतम गंभीरने ताशेरे ओढले आहेत. लग्न हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचा मुद्दा गंभीरने उपस्थित केला आहे.

'लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना निवडीचं स्वातंत्र्य आहे. कोणालाही त्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. अशाप्रकारची वक्तव्यं करताना नेत्यांनी काळजी घ्यायला हवी.' असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे.

मध्य प्रदेशातील गुणा भागातील भाजप आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्याविषयी व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं.

''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले.

इटलीत जाऊन लग्न करणारे विराट-अनुष्का देशद्रोही : भाजप आमदार


पन्नालाल शाक्य यांनी विराट आणि अनुष्काला पैशाचा सदुपयोग करण्याबाबत सल्लाही दिला. ''विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे'', असं ते म्हणाले.

हनिमूनसाठी 'पृथ्वीवरचा स्वर्ग' म्हणजे काश्मिर ही सर्वोत्तम जागा आहे, असं मत अनंतनागचे भाजप नेते रफीक वाणी यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी आपला मधुचंद्र काश्मिरला साजरा केला असता, तर तिथल्या पर्यटनालाही चालना मिळाली असती, असं मत त्यांनी मांडलं.

इटलीमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्याला विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांसह काही निवडक पाहुणेच उपस्थित होते. आज दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.

अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या घरी गृहप्रवेश केला आहे. हनिमूनहून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं आहे. अनुष्का-विराटचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या :

रिसेप्शनला या, विराट-अनुष्काचं मोदींना निमंत्रण


विराट कोहलीच्या घरी अनुष्काचा गृहप्रवेश


'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं


विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ


दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन


विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!


विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड!


विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!


विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?


पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा


VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gautam Gambhir on Virat-Anushka’s Italy wedding latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV