भर मैदानात ग्लेन मॅक्सवेलने नक्कल करुन विराटला डिवचलं !

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Sunday, 19 March 2017 8:28 AM
भर मैदानात ग्लेन मॅक्सवेलने नक्कल करुन विराटला डिवचलं !

रांची : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झलक रांची कसोटीतही पाहायला मिळाली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं विराट कोहलीचा झेल पकडला, त्या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आनंद साजरा करणं स्वाभाविक आहे. पण ग्लेन मॅक्सवेलनं विराटची नक्कल करून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.

रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी एक चौकार अडवण्याच्या प्रयत्नात विराटचा उजवा खांदा दुखावला होता. त्या वेळी वेदनांनी कळवळणाऱ्या भारतीय कर्णधारानं डाव्या हातानं आपला उजवा खांदा दाबून धरला होता. विराटच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना मॅक्सवेलनं भारतीय कर्णधाराच्या त्याच कृतीची नक्कल केली.

दरम्यान, रांची कसोटीचा तिसरा दिवस हा टीम इंडियाचा शतकवीर चेतेश्वर पुजाराचा ठरला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक झळकावलंच, पण अख्खा दिवस एक खिंड थोपवून ऑस्ट्रेलियाला या कसोटीवर पकड घेऊ दिलेली नाही. या कसोटीत भारतानं तिसऱ्या दिवसअखेर सहा बाद 360 धावांची मजल मारली असून, पहिल्या डावातल्या आघाडीसाठी टीम इंडियाला अजूनही 92 धावांची आवश्यकता आहे.

भारतीय संघाच्या दृष्टीनं समाधानाची बाब म्हणजे झुंजार शतकवीर चेतेश्वर पुजारा अजूनही मैदानात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी पुजारा 130, तर रिद्धिमान साहा 18 धावांवर खेळत होता. पुजारानं 328 चेंडूंमधली नाबाद 130 धावांची खेळी 17 चौकारांनी सजवली. पुजारानं मुरली विजयच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची, तर अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. या दोन भागिदाऱ्यांनी भारतीय डावाला आकार दिला.

पाहा व्हिडीओ –

First Published: Sunday, 19 March 2017 8:28 AM

Related Stories

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका दुबईत?
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका दुबईत?

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट मालिकेच्या चर्चांना पुन्हा

हर्षा भोगले सध्या कुठे आहेत?
हर्षा भोगले सध्या कुठे आहेत?

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या कॉमेंट्री बॉक्समधून

स्मिथकडून बीअरची ऑफर, रहाणेचं उत्तर...
स्मिथकडून बीअरची ऑफर, रहाणेचं उत्तर...

शिमला : भारताविरुद्धच्या मालिकेती पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट

आर अश्विनला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी!
आर अश्विनला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी!

शिमला: धर्मशाला कसोटीतील विजयानंतर भारताचा अष्टपैलू रवीचंद्रन

धोनीच्या 'आधार'ची माहिती लीक, साक्षीचा रवीशंकर प्रसाद यांच्यावर निशाणा
धोनीच्या 'आधार'ची माहिती लीक, साक्षीचा रवीशंकर प्रसाद यांच्यावर...

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची वैयक्तिक

लायनल मेस्सीवर चार सामन्यांसाठी बंदी
लायनल मेस्सीवर चार सामन्यांसाठी बंदी

ब्यूनस आयर्स : अर्जेंटीना फुटबॉल टीमचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम
आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम

शिमला : ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबरच भारताचं कसोटी

टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस
टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस

शिमला : विराट कोहलीच्या टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत मिळवलेल्या

विराट कोहली आयपीएलला मुकणार?
विराट कोहली आयपीएलला मुकणार?

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलच्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली

शिमला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान अनेक कटू