बर्थ डे स्पेशल : जेव्हा 'हँगओव्हर'मध्ये हर्शल गिब्सने मैदानात वादळ आणलं होतं!

हर्शल गिब्सने दक्षिण आफ्रिकेकडून 90 कसोटी सामने, 248 वनडे आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

बर्थ डे स्पेशल : जेव्हा 'हँगओव्हर'मध्ये हर्शल गिब्सने मैदानात वादळ आणलं होतं!

मुंबई : क्रिकेट विश्वातील लोकप्रिय फलंदाजांपैकी एक दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्शल गिब्स त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. हर्शल गिब्सने दक्षिण आफ्रिकेकडून 90 कसोटी सामने, 248 वनडे आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

गिब्स क्रिकेटच्या मैदानात जेवढा चर्चेत राहिला तेवढाच तो मैदानाच्या बाहेरही चर्चेत असायचा. मग ते मॅच फिक्सिंगचं प्रकरण असो किंवा सामन्याच्या एक दिवस अगोदर दारु पिणं आणि हँगओव्हर असतानाच फलंदाजी करणं, गिब्सने या सर्व गोष्टी जाहीरपणेही स्वीकारल्या आहेत.

हँगओव्हरमध्ये 175 धावांची खेळी

गिब्स मैदानातील त्याच्या स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. 12 मार्च 2006 रोजी गिब्सने केलेली ती खेळी कुणीही विसरु शकत नाही, जेव्हा जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 434 धावांचं डोंगराएवडं आव्हान दिलं होतं आणि गिब्सने एकट्यानेच 175 धावांची खेळी करत विजय मिळवून दिला होता. गिब्सच्या या खेळीमध्ये एकूण 21 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

वन डे क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या संघाने 400 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करत विजय मिळवला होता. गिब्सने या खेळीबाबत ‘टू द पॉईंट : द नो-होल्ड्स-बार्रेड ऑटोबायोग्राफी’मध्ये याबाबत खुलासा केला होता, की हँगओव्हरच्या परिस्थितीत ही 175 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या माईक हसीनेही याबाबत आपल्या पुस्तकात उल्लेख केला होता.

वन डे क्रिकेटमध्ये 6 चेंडूत सलग 6 षटकार

गिब्सची ओळख वन डे क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्हणून होती. गिब्स जगातील एकमेव फलंजा आहे, ज्याने वन डे मध्ये 6 चेंडूत सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. 2007 सालच्या विश्वचषकादरम्यान नेदरलँडविरुद्ध खेळताना वान बुंगेच्या षटकात गिब्सने षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. यानंतर वान बुंगेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मॅच फिक्सिंग

क्रिकेट करिअरमध्ये गिब्सने तो काळही पाहिला, जेव्हा त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. हेंसी क्रोनिएसोबत हर्शल गिब्स मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. क्रोनिएने गिब्सला 20 पेक्षा कमी धावा करण्यासाठी 15 हजार डॉलरची ऑफर दिली होती. गिब्सने ही ऑफर स्वीकारली होती, मात्र नंतर त्याचं मन बदललं आणि सामन्यात 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याच्यावर 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर गिब्स भारत दौऱ्यावर येण्यासाठी पळवाट काढत होता. कारण, भारतीय पोलीस मॅच फिक्सिंग प्रकरणी गिब्सची चौकशी करणार होते. हा फिक्सिंगचा तोच काळ होता, जेव्हा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जाडेजा यांसारख्या खेळाडूंचंही नाव मॅच फिक्सिंगमध्ये आलं होतं.

गिब्सने कसोटी क्रिकेटमध्ये 41.95 च्या सरासरीने 6 हजार 167 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 14 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. तर वन डेत गिब्सने 36.13 च्या सरासरीने 8 हजार 94 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 21 शतकं आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.

टी-20 सामन्यात गिब्सच्या नावावर 400 धावा आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 90 आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: happy birthday when herschelle Gibbs a hangover inning which can never forget
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: herschelle Gibbs हर्शल गिब्स
First Published:
LiveTV