क्रिकेटर हरभजन सिंह विशाल करियाचा भेटीला, पण... 

कमला मिल अग्नितांडवातील आरोपी विशाल करिया याला भेटण्यासाठी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह काल (गुरुवार) रात्री थेट त्याच्या घरी गेला होता. पण मीडियाचे कॅमेरे पाहताच हरभजन सिंहने तिथून काढता पाय घेतला.

क्रिकेटर हरभजन सिंह विशाल करियाचा भेटीला, पण... 

मुंबई : कमला मिल अग्नितांडवातील आरोपी विशाल करिया याला भेटण्यासाठी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह काल  (गुरुवार) रात्री थेट त्याच्या घरी गेला होता. पण मीडियाचे कॅमेरे पाहताच हरभजन सिंहने तिथून काढता पाय घेतला.

कमला मिल प्रकारणातील आरोपींना लपवून ठेवल्याप्रकरणी विशालला काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.  विशालचे सर्व मोठ्या क्रिकेटपटूंशी चांगले संबंध आहेत. मात्र, यावेली हरभजन त्याला भेटण्यासाठी का आला होता हे अद्याप समजू शकलेलं नाही. आमच्या प्रतिनिधीने हरभजनशी बोलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, यावेळी हरभजनने काहीही बोलण्यास नकार दिला.सूत्रांच्या माहितीनुसार, हरभजन आणि विशाल करिया हे फारच जवळचे मित्र आहेत. जवळजवळ 10 वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. तसेच अनेक पार्ट्यांमध्ये देखील ते एकत्र दिसून आले होते. 2016 साली हरभजननं विशाल सोबतचा एक फोटोही शेअरही केला होता.

दरम्यान, विशाल करियाचे क्रिकेटच्या सट्टा जगताशीही संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा त्याच्यावर दाखल नाही.

संंबंधित बातम्या :

कमला मिल आग प्रकरणी आरोपी विशाल करियाला जामीन मंजूर

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Harbhajan singh reached late night to meet vishal kariya latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV