हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं डेटिंग?

एली अवराम बिग बॉसच्या एका पर्वात झळकली होती. त्याशिवाय तिने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.

हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं डेटिंग?

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं जुनं आहे. नुकतंच विराट-अनुष्का यांच्या लग्नामुळे हे नातं दृढ झालं. आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत.

हार्दिक पांड्या सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आह. एलीसुद्धा दक्षिण आफ्रिकेला फेरफटका मारण्यासाठी गेली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एली हार्दिकची गर्लफ्रेण्ड असल्यावर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आला आहे.

शिखर धवनची बायको आयेशाने त्यांची मुलगी रियाच्या 13 व्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दौऱ्यावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या बेटर हाफ (वॅग्स- वाईफ अँड गर्लफ्रेण्ड्स) दिसत आहेत. रोहितची पत्नी रितीका, भुवीची पत्नी नुपूर, अश्विनची पत्नी प्रिती, उमेशची पत्नी तान्या, राहाणेची पत्नी राधिका यांच्यासोबत एलीसुद्धा हजर आहे.
एली अवराम बिग बॉसच्या एका पर्वात झळकली होती. त्याशिवाय तिने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.

❤️🔐 #love #stories

A post shared by Elisabet Elli AvrRam (@elliavrram) on
हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

शर्मिला टागोर-मन्सूर अली खान पतौडी यांच्यापासून अलिकडे हरभजन-गीता, युवराज-हेझल, झहीर-सागरीका आणि विराट-अनुष्का अशी क्रिकेट-बॉलिवूड अफेअरची उदाहरणं आहेत. यातच हार्दिक-एलीचं नाव जोडलं जावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hardik Pandya and Actress Elli AvrRam dating? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV