शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम

टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली. चहापानापर्यंत त्याने 93 चेंडूत 108 धावा पूर्ण केल्या होत्या. या खेळीसोबतच त्याने अनेक विक्रमही मोडित काढले.

शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम

कॅण्डी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांची बॅट तळपली. यामध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली. चहापानापर्यंत त्याने 93 चेंडूत 108 धावा पूर्ण केल्या होत्या. या खेळीसोबतच त्याने अनेक विक्रमही मोडित काढले.

  1. एका षटकात 26 धावा ठोकून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता.

  2. पंड्याने पहिल्या 50 धावा 61 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. तर नंतरच्या 50 धावा केवळ 25 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. यामध्ये एकाच षटकात 26 धावा ठोकल्यामुळे पंड्याने जलद शतक पूर्ण केलं.

  3. चहापानापर्यंत 107 धावा ठोकणारा हार्दिक पंड्या पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चहापानाच्या अगोदर पंड्याने शतक पूर्ण केलं होतं. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 2006 साली चहापानापर्यंत 99 धावा पूर्ण केल्या होत्या.

  4. पंड्याने कसोटी कारकीर्दीतलं पहिलंच शतक पूर्ण केलं.

  5. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात वेगवान शतक पूर्ण करणाराही तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

  6. या सामन्यात पंड्याने सलग तीन षटकार ठोकले. यासोबतच या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीतही पंड्या चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या वर्षात एकूण 26 षटकार ठोकले आहेत. या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इयॉन मॉर्गन (33), दुसऱ्या क्रमांकावर एव्हिन लेविस (32), तर 27 षटकार ठोकणारा बेन स्टोक तिसऱ्या क्रमांकावर आहे.


संबंधित बातमी : 5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV