टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 1:10 PM
टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया

लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पण याचवेळी भारताच्या हार्दिक पांड्यानं कोट्यवधी चाहत्यांची मनं मात्र जिंकून घेतली.

भारताचे जबरदस्त फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर ढेपाळत असताना हार्दिक पांड्यानं मात्र एकवेळ सामन्यात अक्षरश: जान आणली होती. फलंदाजी कशी करायची हेही त्यानं सर्व आघाडीच्या फलंदाजांना दाखवून दिलं. पण जाडेजाच्या एका छोट्याशा चुकीमुळे पांड्याला आपली विकेट गमवावी लागली. अन् इथंच भारतानं सामनाही गमावला.

अवघ्या 43 चेंडूत 76 धावा फटकावणाऱ्या पांड्यानं तुफानी फटकेबाजी करत टीम इंडियाची लाज राखली. दरम्यान, या पराभवानंतर पांड्यानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यानंतर पांड्या एवढा हताश होता की, त्यानं पहाटे 3 वाजता (इंग्लंडमधील वेळेनुसार) एक ट्वीट केला. या ट्वीटमध्ये पांड्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 भारतीय संघासाठी एक उत्कृष्ट अनुभव होता. आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.’

 

Hardik pandya 1

 

‘म्हणून पांड्या हिरो ठरला’

 

एकीकडे भारताचे फलंदाज चाचपडत असताना पांड्यानं मात्र, मैदानावर मात्र अक्षरश: धुमाकूळ घातला होता. 23व्या ओव्हरमध्ये पांड्यानं अक्षरश: कमाल केली होती. त्यानं शादाबच्या पहिल्याच तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक चौकार ठोकला तर सहाव्या चेंडूवर 1 रन काढून स्ट्राईक आपल्याकडे घेतली. या एकाच ओव्हरमध्ये पांड्यानं तब्बल 23 धावा घेतल्या होत्या.

26व्या ओव्हरमध्ये देखील पांड्यानं शेवटच्या दोन चेंडूवर षटकार ठोकले होते. पण 27व्या ओव्हरमध्ये एक धाव घेण्याच्या नादात पांड्या बाद झाला. त्यावेळी भर मैदानात त्यानं आपली नाराजी व्यक्त केली. पण जेव्हा तो पव्हेलियनकडे परतला त्यावेळी एखाद्या हिरोप्रमाणे त्याला प्रेक्षकांनी मानवंदना दिली.
जरी पांड्यांचं शतक हुकलं, त्याला टीम इंडियाला विजय मिळवून देता आला नाही तरी त्यानं कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र आपसूकच जिंकली.

First Published:

Related Stories

‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर...

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा

भारत-वेस्ट इंडिजमधल्या पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचं पाणी!
भारत-वेस्ट इंडिजमधल्या पहिल्या वनडे...

पोर्ट ऑफ स्पेन: भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना

पाचही वनडेत अजिंक्य रहाणे सलामीला येईल: विराट कोहली
पाचही वनडेत अजिंक्य रहाणे सलामीला...

पोर्ट ऑफ स्पेन: वेस्टइंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित

आयसीसीकडून बीसीसीआयला 26 अब्ज रुपये
आयसीसीकडून बीसीसीआयला 26 अब्ज रुपये

मुंबई: आयसीसीच्या ज्या महसुलावरुन बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीत

कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीने मौन सोडलं!
कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीने...

पोर्ट ऑफ स्पेन : कोहली-कुंबळे वादावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

टॉस जिंकल्यास फलंदाजी, बैठकीतला 'तो' निर्णय विराटने धुडकावला?
टॉस जिंकल्यास फलंदाजी, बैठकीतला 'तो'...

मुंबई : अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित
प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर...

लंडन : टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं

कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली काय बोलणार?
कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली...

मुंबई: टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी करार वाढवण्यास

पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली, धोनी, युवराजचे आभार!
पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली,...

मुंबई : मैदानात भारत आणि पाकिस्तान प्रतिस्पर्धी आहेत, पण

कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर
कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध...

मुंबई: अनिल कुंबळेसारख्या कडक शिस्तीच्या पण रिझल्ट देणाऱ्या