श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी पंड्याला विश्रांती

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी पंड्याला विश्रांती

 

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे.

हार्दिक पंड्यावर अलीकडच्या काळात आलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. संभाव्य दुखापतीचा धोका टाळण्यासाठी पंड्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत मेहनत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

hardik pandya

दरम्यान, भारतीय संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतानं जर श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यास ती भारताची ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे. तसेच यामुळे कर्णधार कोहली देखील यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेईल.

संबंधित बातम्या :

'त्या' खेळीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला : हार्दिक पांड्या 


अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कपिलदेवच्याही पुढे


पंड्या जगातल्या कोणत्याही मैदानात चौकार, षटकार ठोकू शकतो : शास्त्री


मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या


हार्दिक पंड्या भविष्यातील कपिल देव : एमएसके प्रसाद

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hardik pandya rested for upcoming test series latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV