द. आफ्रिकेविरुद्ध पंड्याची घोडचूक, दिग्गजांकडून कानउघडणी

क्रिकेटच्या मैदानावरील एक छोटीशी चूकही संपूर्ण संघाला महागात पडू शकते. अशीच काहीशी चूक आज (सोमवार) हार्दिक पंड्यानं पहिल्या डावात केली.

द. आफ्रिकेविरुद्ध पंड्याची घोडचूक, दिग्गजांकडून कानउघडणी

सेन्चुरियन (द. आफ्रिका) : क्रिकेटच्या मैदानावरील एक छोटीशी चूकही संपूर्ण संघाला महागात पडू शकते. अशीच काहीशी चूक आज (सोमवार) हार्दिक पंड्यानं पहिल्या डावात केली. त्यानं केलेल्या चुकीनं भारतीय संघ बराचसा अडचणीत आला. त्यामुळे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी पंड्याला खडे बोल सुनावले.

द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या मैदानावर होते. या दोन्ही फलंदाजांकडून भारताला बऱ्याच आशा होत्या. पण आपल्या धावसंख्येत अवघ्या 4 धावांची भर घालून पंड्या रनआऊट झाला. यामध्ये सर्वस्वी चूक पंड्याचीच होती. पंड्यानं एक सरळ फटका मारुन धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरुवातीलाच कोहलीनं पंड्याला नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी पंड्या मागे फिरला. पण आपण क्रिझमध्ये आरामात पोहचू असा अतिआत्मविश्वास त्याला नडला. त्यावेळी फिलेंडरनं फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला. यावेळी पंड्या क्रिझच्या जवळ तर पोहचला. पण त्याचा पाय आणि बॅट दोन्हीही हवेत होतं. त्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आलं.ज्यावेळी भारतीय संघाला एका मजबूत भागीदारीची गरज होती तेव्हाच पंड्या अशाप्रकारे बाद झाल्यानं अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यावेळी समलोचन करणाऱ्या सुनील गावसकर यांनी देखील ही चूक अक्षम्य असल्याचं म्हटलं.

दुसरीकडे माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनं देखील हार्दिकवर टीका केली. 'आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते. आपण सचिन तेंडुलकरला पाहा तो किती प्रतिभावंत खेळाडू होता. पण त्याच्यात कधीही अंहकार नव्हता.'दरम्यान, भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. यावेळी कर्णधार कोहलीनं 153 धावांची शानदार खेळी साकारली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hardik pandya run out in 2nd test vs South africa latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV