सामनावीर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण असं असलं तरीही पांड्याला सोशल मीडियावर मात्र अनेकांनी ट्रोल केलं.

सामनावीर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 26 धावांनी भारतावर दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अष्टपैलू हार्दिक पांड्या.

फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवत पांड्यानं या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण असं असलं तरीही पांड्याला सोशल मीडियावर मात्र अनेकांनी ट्रोल केलं.

त्याचं झालं असं की, हार्दिक जेव्हा मैदानावर फलंदाजी करत होता त्यावेळी तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोव्ह्ज घालून आला होता. यानंतर अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरु केलं.

troll 1

मनीष तुलसानी या ट्विटर यूजरनं असं ट्वीट केलं आहे की, 'मी कन्फ्यूज आहे की, ही जादू कुंगफू पांड्याची आहे की, मुंबई इंडियन्सच्या ग्लव्ह्जची आहे की, कॅरेबिअन हेअर-स्टाइलमध्ये.'

troll 2

'हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्सचे ग्लव्ह्ज का घातले आहेत?' असं ट्वीट संतोष नावाच्या एका यूजरनं केलं.

troll 3

कुणी सांगू शकतं की पांड्यानं भारतासाठी खेळताना आपले आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे ग्लव्ह्ज का घातले आहेत? असं ट्वीट केपी नावाच्या एका यूजरनं केलं आहे.

संबंधित बातम्या :

'त्या' खेळीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला : हार्दिक पांड्या 

चेन्नई विमानतळावर टीम इंडिया रिलॅक्स मूडमध्ये!

हार्दिकसारखा खेळाडू संघात असणं ही भाग्याची गोष्ट : विराट

धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी  

दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV