दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!

पांड्याने अॅडम झाम्पाने टाकलेल्या 37 व्या षटकात धमाका केला. त्याने झाम्पाला एक चौकार आणि सलग तीन षटकार ठोकले.

दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!

चेन्नई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे हार्दिक पांड्या.  भारताची 5 बाद 87 अशी बिकट अवस्था झाली असताना, धोनीच्या साथीला पांड्या आला. या दोघांनी आधी भारताच्या संघाला स्थैर्य दिलं, मग धावगती वाढवली.

पांड्याने मग गियर बदलून, थेट त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली. त्याने अवघ्या 66 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावा ठोकल्या.

युवराजचा सलग 6 षटकार मारण्याचा विक्रम मोडायचाय : हार्दिक पंड्या


पांड्याने अॅडम झाम्पाने टाकलेल्या 37 व्या षटकात धमाका केला. त्याने झाम्पाला एक चौकार आणि सलग तीन षटकार ठोकले.


हार्दिक पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक

हार्दिक पांड्याने सिक्सर्सची हॅटट्रिक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या वर्षात पांड्याने सलग तीन षटकारांचा धमाका चार वेळा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, पांड्याने पाकिस्तानविरुद्ध दोनवेळा षटकारांची हॅटट्रिक केली होती.  आधी इमाद वासीमला पांड्याने तीन सिक्सर ठोकले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात शादाब खानलाही पांड्याने तीन षटकारांचं गिफ्ट दिलं होतं.

यानंतर मग नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही, कसोटी सामन्यात पांड्याने श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमाराला सलग तीन षटकार ठोकले होते.

त्यामुळे पांड्याच्या नावावर आता षटकारांच्या चार हॅटट्रिक जमा झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

कथित गर्लफ्रेण्डविषयी हार्दिक पांड्या म्हणतो...


लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड?


क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV