हेलिकॉप्टरनंतर आता हेलिस्कूप शॉट, व्हिडिओ व्हायरल

ट्विटरवर या आगळ्या वेगळ्या शॉटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हेलिकॉप्टरनंतर आता हेलिस्कूप शॉट, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला माहितच असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फलंदाज एक अनोख्या प्रकारचा शॉट खेळत आहे.

https://twitter.com/its_tabrez_4u/status/905682558876213248

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फलंदाज बॅट हवेत फिरवून हा शॉट मारताना दिसतो. हा सामना कोणता आणि कुठे खेळवण्यात आला याची माहिती या ट्विटर पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही.

हा अनोखा शॉट खेळणाऱ्या फलंदाजाचं नाव ह्यूगो हॅमंड असल्याचं बोललं जात आहे. तो इंग्लंडचा क्रिकेटर आहे. हा फलंदाज नेमका कोण आहे, याची अद्याप खात्री झालेली नाही. मात्र या शॉटचं नाव हेलिस्कूप शॉट असल्याचं बोललं जात आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV