...म्हणून सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही!

By: | Last Updated: > Monday, 13 February 2017 4:19 PM
...म्हणून सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही!

बिकानेर : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील मोठमोठ तारे दिसले आहेत. पण काही स्टार्स असेही आहेत, ज्यांना कपिल शर्माने अनेक वेळा त्याच्या शोमध्ये आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांनी कपिलला नकार दिला आहे.

या कलाकारांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.

पण कपिल शर्माने अशाच एका रहस्यावरुन पडदा उठवला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये अखेर का आलेला नाही, याचा उलगडा स्वत: कपिलने केला आहे.

कपिल म्हणाला की, जे लोक चांगली कामं करतात, ज्यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मला माझ्या शोमध्ये आमंत्रित करायचं असतं. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते माझा शो पाहतात. पण मी त्यांना शोमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, तेव्हा आम्ही शोमध्ये येऊन काय बोलणार, असं उत्तर ते देतात.

लतादीदींनी मला एक घड्याळ भेट म्हणून दिलं आहे, जे मी सांभाळून ठेवलं आहे. माझ्या शोमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन आले होते, तो अतिशय शानदार क्षण होता, असं कपिल शर्मा म्हणाला.

First Published:

Related Stories

गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड
गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड

मुंबई : सहा दिवसांनंतर ट्विटरवर परतलेल्या गायक अभिजीत

अंकिता लोखंडे आणि कुशल टंडनमध्ये काय शिजतंय?
अंकिता लोखंडे आणि कुशल टंडनमध्ये काय शिजतंय?

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता

अक्षय, सायनाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी
अक्षय, सायनाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल

'पाकिजा'च्या अभिनेत्रीची करुण कहाणी, हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाचा पळ
'पाकिजा'च्या अभिनेत्रीची करुण कहाणी, हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाचा पळ

मुंबई : गीता कपूर… कदाचित हे नाव तुमच्या विस्मृतीत गेलं असेल. मात्र

करण जोहरच्या आगामी सिनेमात सलमान-कतरिना एकत्र?
करण जोहरच्या आगामी सिनेमात सलमान-कतरिना एकत्र?

मुंबई : दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’ नंतर आता

सोनू निगमनंतर राम गोपाल वर्मांचाही ट्विटरला रामराम
सोनू निगमनंतर राम गोपाल वर्मांचाही ट्विटरला रामराम

मुंबई : गायक सोनू निगमनंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनीही

''लिपस्टिक अंडर माय बुरखा' रिलीज होण्याचा मार्ग मोकळा!
''लिपस्टिक अंडर माय बुरखा' रिलीज होण्याचा मार्ग मोकळा!

नवी दिल्ली : ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला एका

‘सचिन ए बिलीयन ड्रीम्स’ची दोन दिवसांची कमाई किती?
‘सचिन ए बिलीयन ड्रीम्स’ची दोन दिवसांची कमाई किती?

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन

मराठमोळी अंजली पाटील सुपरस्टार रजनिकांतच्या सिनेमात झळकणार
मराठमोळी अंजली पाटील सुपरस्टार रजनिकांतच्या सिनेमात झळकणार

मुंबई : नाशिकची अंजली पाटील ही मराठमोळी तरुणी सुपस्टार