सचिनला घडवणाऱ्या आचरेकरांना भारतरत्न द्या : विनोद कांबळी

आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यांनी आम्हाला घडवलं, अशा शब्दात विनोद कांबळींनी आपल्या गुरुंचे ऋण व्यक्त केले.

Honor Sachin Tendulkar’s Guru Ramakant Acharekar by Bharatratna, Says Vinod Kambli latest update

सिंधुदुर्ग : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’चा सन्मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळे. त्यामुळे रमाकांत आचरेकर यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असं मत माजी क्रिकेटपटू, सचिनचा मित्र आणि आचरेकरांचा शिष्य विनोद कांबळी यांनी व्यक्त केलं.

मुंबईतील भेंडीबाजारात माझा जन्म झाला. गल्ली क्रिकेट खेळायचो. ज्यावेळी बाऊंड्री मारायचो, त्यावेळी बॉल अर्धा कापून यायचा. कुणाच्या कालवणात गेला, कुणाच्या बिर्याणीमध्ये गेला. मात्र आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यांनी आम्हाला घडवलं, अशा शब्दात विनोद कांबळींनी आपल्या गुरुंचे ऋण व्यक्त केले.

सचिनला ‘भारतरत्न’ हा सगळ्यात मोठा मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळेच. आचरेकर सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला, मात्र मला वाटतं त्यांना ‘भारतरत्न’ दिला पाहिजे अशा भावना विनोद कांबळी यांनी व्यक्त केल्या.

ज्यांनी भारतीय संघाला आठ ते नऊ खेळाडू दिले, त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे होता. संपूर्ण जीवन आचरेकर सरांनी क्रिकेटसाठी दिलं. जे आचरेकर सरांनी आम्हाला दिलं, त्याची परतफेड करण्यासाठी मी सिंधुदुर्गमधील ग्रामीण भागात खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण देईन. मला मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये खूप संधी आहे मात्र प्रशिक्षणासाठी मी ग्रामीण भाग निवडाला, असं विनोद कांबळींनी सांगितलं.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Honor Sachin Tendulkar’s Guru Ramakant Acharekar by Bharatratna, Says Vinod Kambli latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आर्चरी स्पर्धेदरम्यान बाण थेट मैदानाबाहेर, खेळाडूच्या हातात घुसला!
आर्चरी स्पर्धेदरम्यान बाण थेट मैदानाबाहेर, खेळाडूच्या हातात घुसला!

रत्नागिरी : आर्चरी स्पर्धेदरम्यान एका स्पर्धकाच्या धनुष्यातून

मुरली विजयचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
मुरली विजयचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नागपूर : सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या

बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा

मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!

केप टाऊन : ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!
VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!
'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि

IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला
IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला

नागपूर:  भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत

टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती
टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती

नागपूर : जलद गोलंदाज असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा टीम इंडियाला

स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले

कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री