बीसीसीआयची अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

बीसीसीआयची अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायुडूवर बीसीसीआयने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. 11 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यातील त्याच्या वागणुकीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

दोन सामन्यांच्या बंदीमुळे अंबाती रायडूला आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेस आणि झारखंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकावं लागणार आहे. अंबाती रायडू हैदराबाद संघाचं नेतृत्त्व करतो. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

अंबाती रायडूची चुकी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. फिल्ड अंपायर अभिजीत देशमुख, उल्हास विश्वासराव गांधे आणि थर्ड अंपायर अनिल दांडेकर यांनी अंबाती रायडूवर आरोप निश्चित केले होते. रायडूने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयने त्याला चुकीची शिक्षा दिली आहे.

यामुळे रायडूने नाराजी व्यक्त केली
हैदराबादचा गोलंदाज मोहम्मद सिराज 20व्या षटकात गोलंदाजी करत होता. अखेरच्या बॉलवर कर्नाटकचा फलंदाज करुण नायरने शॉट मारला. बाऊंड्रीवर फिल्डिंग करणाऱ्या मेहदी हसनने चौकार जाण्यापासून रोखलं. पण रिप्लेमध्ये पाहिल्यावर त्याच्या पायाचा बाऊंड्री लाईनला स्पर्श झाला होता. परंतु पंचांनी आधी दोन धावाच दिल्या होत्या. परंतु कर्नाटकचा संघ फील्डिंगसाठी मैदानात आल्यावर कर्णधार विनय कुमारने याबाबत पंचांना सांगितलं. यानंतर कर्नाटकच्या एकूण धावसंख्येत दोन अतिरिक्त धावा जोडण्यात आल्या. या सामन्यात हैदराबादला विजयासाठी सुरुवातीला 203 धावांची गरज होची. पण पंचांच्या निर्णयानंतर आव्हान 205 धावांचं झालं. पण असं होतं तक हा निर्णय डाव संपण्याच्याआधीच द्यायला हवा होता, असं रायडूचं म्हणणं होतं.

"205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाने निर्धारित 20 षटकात 203 धावा केल्या. पण सामना संपल्यानंतर हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आपल्या संघासह मैदानात आला आणि सुपरओव्हर खेळवण्याची मागणी करु लागला. मलाही नियम माहित आहेत. अंपायरने कोणाला बाद दिलं तर तो मैदानातून बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याला समजतं की त्याला चुकीच्या पद्धतीने बाद केलं, तर त्याला परत बोलावलं जातं का?," असं रायडू म्हणाला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hyderabad Ambati Rayudu gets two-match ban for protesting umpiring decision
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV