EMI साठी पैसे नसल्याने दोन वर्ष गाडी लपवली : पांड्या

2015 मध्ये आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी हार्दिक पांड्याने सांगितलं.

EMI साठी पैसे नसल्याने दोन वर्ष गाडी लपवली : पांड्या

मुंबई : ईएमआय न भरल्यामुळे आयपीएल पदार्पणापूर्वी दोन वर्ष आपली गाडी असल्याचं लपवून ठेवलं होतं, अशी आठवण
टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सांगितली. यूट्युबवर गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये हार्दिकने दिलखुलास गप्पा मारल्या.

2015 मध्ये आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी हार्दिक पांड्याने सांगितलं. गाडीचे हप्ते भरण्यासाठी त्यावेळी येणारी पै न् पै वाचवावी लागत होती. मी पाच आणि दहा रुपयांचीही बचत करायचो. जवळपास तीन वर्ष मी स्ट्रगल केला, असं हार्दिक सांगतो.

'आयपीएलच्या वेळी मला 70 हजार रुपये मिळाले. आता काही काळ आपण तग धरु शकतो, असं मला वाटलं. दोन वर्ष आम्ही ईएमआय भरला नव्हता. आम्ही स्मार्ट होतो. आमची गाडी मी लपवून ठेवायचो, कारण ती हातून जावी, असं मला वाटत नव्हतं.' अशी आठवण हार्दिकने सांगितली.

'कुठलीही नवीन गोष्ट विकत घेण्याऐवजी त्या तीन वर्षात आम्ही कारसाठी पैसे वाचवून ठेवले. अन्न आणि कारचे हप्ते या दोनच गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या' असं हार्दिक म्हणतो.

हार्दिक पांड्याने पदार्पण केलं, त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली. 'देव दयाळू आहे. पहिल्याच वर्षी आम्ही आयपीएल जिंकली आणि मला 50 लाख रुपयांचा चेक मिळाला. तेव्हा मला मोफत कार मिळाली आणि मी एक कार विकतही घेतली.' असं हार्दिकने सांगितलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: I hid car since unable to pay EMI before IPL, says Cricketer Hardik Pandya latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV