... तर आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळणार : विराट कोहली

मी अशीच मेहनत करत राहिलो तर माझ्यात आठ ते दहा वर्षांचा खेळ बाकी आहे. मी दररोज नव्या गोष्टींची सुरुवात करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचंही माझ्यासाठी तेवढंच महत्त्व आहे, असंही विराट म्हणाला.

... तर आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळणार : विराट कोहली

नवी दिल्ली : आपल्यात अजून आठ ते दहा वर्षांचं क्रिकेट बाकी असल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे. फिटनेस आणि ट्रेनिंग अशीच कायम राहिली तर आपण आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळू असं विराटने सांगितलं.

विराटने गेल्या काही दिवसात अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. तर आणखी मोठ्या विक्रमांच्या तो जवळ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग दोन शतकं ठोकून तो सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. वन डेतील 30 शतकं पूर्ण करत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली.

यासोबतच विराट कोहली शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरनंतर वन डेत सर्वाधिक शतकं ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत. विराटने या वर्षात सहा शतकं आणि सात अर्धशतकं पूर्ण करत 1639 धावा केल्या आहेत.

चांगली कामगिरी करण्यामागे काहीही रहस्य नाही. अनेकांना तर हे देखील माहिती नाही की आम्ही किती मेहनत करतो. थकलेलं असतानाही 70 टक्के ट्रेनिंग पूर्ण करुन एखादा खेळाडू मध्येच आराम करतो, असं मी अजून पाहिलेलं नाही. आम्ही काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावतो, असं विराटने एका कार्यक्रमात सांगितलं.

चांगली कामगिरी करण्याची माझी भूक कधीही संपत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी अशीच मेहनत करत राहिलो तर माझ्यात आठ ते दहा वर्षांचा खेळ बाकी आहे. मी दररोज नव्या गोष्टींची सुरुवात करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचंही माझ्यासाठी तेवढंच महत्त्व आहे, असंही विराट म्हणाला.

आमच्या काळात गॅजेट्स नव्हते. आजकाल लोक आयफोन किंवा आयपॅडवर व्यस्त असतात. आमच्या वेळी कुणाकडे व्हिडिओ गेम असेल तर सर्व जण त्याच्याकडे जाऊन तो गेम खेळण्याचा प्लॅन करायचो. मी माझं बालपण रस्ते आणि मैदानांवर विविध खेळ खेळून काढलंय. त्यामुळे तरुणांनी घराबाहेर पडावं आणि कोणत्या ना कोणत्या खेळात प्राविण्य मिळवावं, असं आवाहन विराटने तरुणांना केलं.

तरुण खेळांकडे आकर्षित झाले तर आपल्याकडे खेळाडूंची संख्या वाढेल, ज्यामुळे मोठी मदत होईल, अंसही विराट म्हणाला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV