आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार

विराट कोहली आयसीसीच्या वन डे आणि कसोटी संघ 2017 चा कर्णधार असेल.

आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार

मुंबई: आयसीसीने वार्षिक पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आता वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही संघाचं नेतृत्त्व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे.

विराट कोहली आयसीसीच्या वन डे आणि कसोटी संघ 2017 चा कर्णधार असेल.

दोन्ही संघात भारताचे तीन तीन खेळाडू आहेत. वन डे संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे.

तर कसोटी संघात विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा आणि रवीचंद्रन अश्विनने 11 जणांच्या संघात स्थान पटकावलं आहे.

वन डे आणि कसोटी अशा दोन्ही संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, डी कॉक आणि बेन स्टोक यांचा समावेश आहे.

विराट कोहलीने गेल्या वर्षभरात जबरदस्त फलंदाजी केली आहे. कोहलीच्या याच कामगिरीमुळे त्याची पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी संघात वर्णी लागली. तर कोहली चौथ्यांदा आयसीसीच्या वन डे संघात निवडला गेला आहे. यापूर्वी तो 2012, 2014 आणि 2016 मध्ये आयसीसीच्या संघात होता.

आयसीसीचा कसोटी संघ

 1. डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका)

 2. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

 3. विराट कोहली (भारत)

 4. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

 5. चेतेश्वर पुजारा (भारत)

 6. बेन स्टोक्स (इंग्लंड)

 7. क्विंन्टन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) (विकेटकीपर)

 8. रवीचंद्रन अश्विन (भारत)

 9. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

 10. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)

 11. जेम्स अँडरसन (इंग्लंड)


आयसीसीचा वन डे संघ

 1. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

 2. रोहित शर्मा (भारत)

 3. विराट कोहली (भारत)

 4. बाबर आझम (पाकिस्तान)

 5. एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका)

 6. क्विंन्टन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) (विकेटकीपर)

 7. बेन स्टोक्स (इंग्लंड)

 8. ट्रेण्ट बोल्ट (न्यूझीलंड)

 9. हसन अली (पाकिस्तान)

 10. राशीद खान (अफगाणिस्तान)

 11. जसप्रीत बुमरा (भारत)

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ICC Test and ODI Team of the Year 2017 announced
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV