धोनीसारखाच आणखी एक रांचीचा स्टार, दूधवाल्याच्या मुलाची निवड

उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या पंकजचे वडील दूध विक्रेते आहेत

धोनीसारखाच आणखी एक रांचीचा स्टार, दूधवाल्याच्या मुलाची निवड

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीतील आणखी एका क्रिकेटपटूने राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आहे. झारखंडच्या पंकज यादवची अंडर 19 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या पंकजचे वडील दूध विक्रेते आहेत.

एकोणीस वर्षांखालील विश्वचषकाचं 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व मुंबईचा उदयोन्मुख सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉकडे देण्यात आलं आहे.

हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषला धोनीही वाचवू शकला नाही !

दरम्यान, पृथ्वी शॉकडे टीम इंडियाचा उद्योन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे, तसंच नाव झारखंड क्रिकेटमध्ये पंकज यादवचं आहे.

धोनी पाठोपाठ पंकजचीही टीम इंडियात निवड होईल, अशी आशा झारखंडवासियांना आहे. धोनीप्रमाणे पंकजही झारखंडचं नाव उंचावेल, असाही विश्वास त्यांना आहे.

“क्रिकेट माझं आयुष्य आहे. अंडर 19 विश्वचषकात उत्तम कामगिरीचा प्रयत्न करेन. धोनी आणि शेन वॉर्न माझे आदर्श आहेत”, अशी प्रतिक्रिया पंकजने निवडीनंतर दिली होती.

संबंधित बातम्या

अंडर 19 विश्वचषकाच्या कर्णधारपदाची धुरा पृथ्वी शॉच्या खांद्यावर 

हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषला धोनीही वाचवू शकला नाही !

धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ICC under 19 world cup : another cricket star from jharkhand, milkman son selected in indian team for world cup 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV