भारत वि. श्रीलंका : वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे.

भारत वि. श्रीलंका : वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहेत.

मुंबईचा अजिंक्य रहाणे आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

 • भारताचा पाच वन डे, एका टी20 सामन्यांसाठीचा संघ जाहीर,

 • श्रीलंकेत पाच वन डे, एका टी20 सामन्यांची मालिका

 • भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश

 • मुंबईच्या रोहित शर्माच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी

 • अजिंक्य रहाणे आणि केदार जाधवचाही संघात समावेश

 • रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती


असा असेल संघ

 1. विराट कोहली (कर्णधार)

 2. शिखर धवन

 3. रोहित शर्मा (उपकर्णधार)

 4. लोकेश राहुल

 5. मनिष पांडे

 6. अजिंक्य रहाणे

 7. केदार जाधव

 8. एम एस धोनी (यष्टीरक्षक)

 9. हार्दिक पंड्या

 10. अक्षर पटेल

 11. कुलदीप यादव

 12. यजुवेंद्र चहल

 13. जसप्रित बुमराह

 14. भुवनेश्वर कुमार

 15. शार्दूल ठाकूर


श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक :

 • 20 ऑगस्ट – पहिला वन डे सामना – डम्बुल्ला

 • 24 ऑगस्ट – दुसरा वन डे सामना – कॅण्डी

 • 27 ऑगस्ट – तिसरा वन डे सामना – कॅण्डी

 • 31 ऑगस्ट – चौथा वन डे सामना – कोलम्बो

 • 3 सप्टेंबर – पाचवा वन डे सामना – कोलम्बो

 • 6 सप्टेंबर – एकमेव टी-20 सामना - कोलम्बो

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV