2023सालच्या वन डे विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे

2021 साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे.

2023सालच्या वन डे विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे

 

मुंबई : 2019 विश्वचषकाआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. 2021 साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे.

2019 सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. यानंतर 2023 साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2011 साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता.

2011 चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता. हा विश्वचषक पटकावून टीम इंडियानं सचिनला खास भेट दिली होती.

दरम्यान, 2015 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं.

2023च्या विश्वचषकाशिवाय 2021 सालच्या प्रस्तावित चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजनही भारतातच करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी असणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India to host 2023 one day world cup latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV