चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर!

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर!

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 23 जूनपासून सुरु होईल.  बीसीसीआयने भारताच्या या दौऱ्याची मंगळवारी घोषणा केली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 1 जून ते 18 जून या कालावधीत खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजसोबत भारत पाच वन डे सामने आणि एक टी-20 सामने खेळणार आहे. 23 जून ते 9 जुलै या काळात हे सामने खेळवण्यात येतील.

पहिले दोन वन डे सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओव्हल मैदानावर 23 आणि 25 जून रोजी खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि चौथा वन डे सामना एंटिगातील सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

अखेरचा आणि पाचवा वन डे सामना जमैकातील सबीना पार्क मैदानात, तर एकमेव टी-20 सामनाही याच मैदानात खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नुकतीच टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ :

 सलामीवीर

 1. रोहीत शर्मा

 2. शिखर धवन

 3. अजिंक्य रहाणे


मधली फळी

 1. विराट कोहली

 2. मनीष पांडे

 3. केदार जाधव

 4. महेंद्रसिंह धोनी

 5. युवराज सिंग


ऑलराऊंडर

 1. हार्दिक पांड्या


फिरकी

 1. आर अश्विन

 2. रवींद्र जाडेजा


वेगवान गोलंदाज

 1. भुवनेश्वर कुमार

 2. उमेश यादव

 3. जसप्रीत बुमराह

 4. मोहम्मद शमी


संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV