ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज

पहिल्या तीन वन डेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज

बंगळुरु : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा वन डे सामना आज बंगऴुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेऴवण्यात येणार आहे. पहिल्या तीन वन डेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.

भारताने आतापर्यंत सलग नऊ विजय मिळवले आहेत, मात्र आजचा सामना जिंकून सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी कोहली ब्रिगेडला आहे.

इंदूरच्या तिसऱ्या वन डेत भारतानं कांगारुंवर 5 विकेट्सनी विजय साजरा केला. या विजयाबरोबरच टीम इंडियानं या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत 5 सामन्यांची ही मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरीत दोन्ही सामने जिंकून श्रीलंकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही व्हाइटवॉश करण्याचं विराट आणि त्याच्या शिलेदारांचं लक्ष्य राहील.

मालिका खिशात टाकल्यानं टीम इंडिया आता संघात काही बदल नक्कीच करु शकते. त्यामुळे आतापर्यंत ज्या खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं होतं. त्यांना संधी मिळू शकते.

या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. भुवनेश्वर कुमार, बुमरा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यात यापैकी कुणाला तरी आराम देऊन इतर गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

तर फलंदाजीमध्येही काही बदल पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत संघाबाहेर असणाऱ्या केएल राहुलला संघात स्थान मिळू शकतं.

दरम्यान, असं असलं तरी चौथा वनडे सामना जिंकून भारत या मालिकेवर आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV