पुजाराचं झुंजार शतक, टीम इंडियाची 360 धावांपर्यंत मजल

By: | Last Updated: > Saturday, 18 March 2017 5:45 PM
India vs Australia ranchi test – Cheteshwar Pujara scores century

रांची: रांची कसोटीचा तिसरा दिवस हा टीम इंडियाचा शतकवीर चेतेश्वर पुजाराचा ठरला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक झळकावलंच, पण अख्खा दिवस झुंज देत ऑस्ट्रेलियाला या कसोटीवर पकड घेऊ दिली नाही.

 

या कसोटीत भारतानं तिसऱ्या दिवसअखेर सहा बाद 360 धावांपर्यंत मजल मारली असून, पहिल्या डावातल्या आघाडीसाठी टीम इंडियाला अजूनही 92 धावांची आवश्यकता आहे. भारतीय संघाच्या दृष्टीनं समाधानाची बाब म्हणजे झुंजार शतकवीर चेतेश्वर पुजारा अजूनही मैदानात आहे.

 

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी पुजारा 130, तर रिद्धिमान साहा 18 धावांवर खेळत होता. पुजारानं 328 चेंडूंमधली नाबाद 130 धावांची खेळी 17 चौकारांनी सजवली. पुजारानं मुरली विजयच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची, तर अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. या दोन भागिदाऱ्यांनी भारतीय डावाला आकार दिला.

 

दुसऱ्या दिवसाचा खेळ

 

लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी दिलेल्या 91 धावांच्या सलामीच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर एक बाद 120 धावांची मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय 42, तर चेतेश्वर पुजारा 10 धावांवर खेळत होता.

 

लोकेश राहुलनं या मालिकेतलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 102 चेंडूंत नऊ चौकारांसह 67 धावांची खेळी उभारली. पॅट कमिन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्यानं यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल दिला.

 

त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 191 धावांच्या भागिदारीनं ऑस्ट्रेलियाला 451 धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाबाद 178 धावांचं योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेलनं 104 धावांची खेळी उभारली.

 

 

First Published:

Related Stories

प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!
प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम

श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?
श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?

कोलंबो : श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाविरोधात शिस्तभंगाची कारवाई

क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!

मुंबई: टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज आणि केकेआरचा विकेटकिपर रॉबिन

राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती
राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती

नवी दिल्ली: लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात

IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात
IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात

मुंबई : मोबाईल हॅण्डसेटचं उत्पादन करणारा चिनी उद्योगसमूह व्हिवोने

'या' महत्वाच्या सामन्यात चक्क थर्ड-अंपायरच नव्हता!
'या' महत्वाच्या सामन्यात चक्क थर्ड-अंपायरच नव्हता!

लंडन: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात सध्या

लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी बीसीसीआयची समिती
लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी बीसीसीआयची समिती

नवी दिल्ली : लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युवराज सिंहकडून मोठी चूक!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युवराज सिंहकडून मोठी चूक!

पोर्ट ऑफ स्पेन : जगभरातील क्रिकेटर आपापल्या स्टाईलसाठी ओळखले जातात.

भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम
भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम

पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे