रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Sunday, 19 March 2017 11:25 PM
रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी आहे. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली आहे.

भारताच्या हाताशी अजूनही 129 धावांची आघाडी असून, या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं.

चेतेश्वर पुजाराचं द्विशतक, रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत नऊ बाद 603 या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.

पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.

पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. पुजारानं 525 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. त्याचं हे कसोटी कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठरलं.

रिद्धिमान साहानं 233 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्याचं हे तिसरं कसोटी शतक होतं. रवींद्र जाडेजानं 55 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.

रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिलं. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम खेळींच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यश आलं. मात्र, रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केल्यानंतर, DRS वापरल्यामुळे साहाला जीवदान मिळालं. पण यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या :

भर मैदानात ग्लेन मॅक्सवेलने नक्कल करुन विराटला डिवचलं !

DRS मुळं रिद्धिमान साहाला जीवदान, ऑस्ट्रेलियन संघ नाराज

First Published: Sunday, 19 March 2017 4:21 PM

Related Stories

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम
आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम

शिमला : ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबरच भारताचं कसोटी

टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस
टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस

शिमला : विराट कोहलीच्या टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत मिळवलेल्या

विराट कोहली आयपीएलला मुकणार?
विराट कोहली आयपीएलला मुकणार?

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलच्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत : विराट कोहली

शिमला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान अनेक कटू

VIDEO: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून पाडव्याच्या खास शुभेच्छा
VIDEO: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून पाडव्याच्या खास शुभेच्छा

मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी

DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात...
DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात...

धर्मशाला: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतानं 2-1

टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो !
टीम इंडियाच्या विजयाचे 6 हिरो !

शिमला: हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम

'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!
'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!

धर्मशाला: धर्मशाला कसोटीत भारतनं ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत

मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा
मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा

धर्मशाला : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला शिवी

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय
कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम  इंडियाने