मार्श-हॅण्ड्सकोम्बने भारताचा विजय हिरावला

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 5:16 PM
मार्श-हॅण्ड्सकोम्बने भारताचा विजय हिरावला

रांची:  रांची: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं पाचव्या विकेटसाठी 124 धावांची झुंजार भागीदारी रचून, टीम इंडियाच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला.

पंचांनी पाचव्या दिवसाचा खेळ थांबवला त्या वेळी ऑस्ट्रेलियानं सहा बाद 204 धावांची मजल मारली होती.

पीटर हॅण्ड्सकोम्बने नाबाद 72 धावा केल्या. त्याने तब्बल 200 चेंडू खेळून काढले. तर मार्शने 197 चेंडूत 53 धावा केल्या.

या कसोटीत आदल्या दिवशीच्या दोन बाद 23 धावांवरून ऑस्ट्रेलियाची पहिल्या सत्रात चार बाद 63 अशी अधिकच बिकट अवस्था झाली. त्यामुळं भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्या कठीण परिस्थितीत शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं नेटानं ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला.

रवींद्र जाडेजानं शॉन मार्शला माघारी धाडून ही जोडी फोडली.   मग रवीचंद्रन अश्विननं ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. पण तोवर खूप उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियानं ही कसोटी वाचवण्यासाठी आवश्यक वेळ खेळून काढला होता.

उपहारापूर्वी इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन दणके दिले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 83 अशी झाली होती.

आधी इशांत शर्माने सलामीवीर मॅट रेनशॉला पायचीत केलं. मग कर्णधार स्मिथच्या त्रिफळा उडवून जाडेजाने मोठा अडथळा दूर केला. रेनशॉने 44  तर स्मिथने 21 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने आज काच्या 2 बाद 23 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रेनशॉ आणि स्मिथने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हलती ठेवली. भारताची आघाडी कमी करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र इशांतने भेदक गोलंदाजी करत रेनशॉला तंबूत धाडलं.

मग पुढच्याच षटकात जाडेजाने कर्णधार स्मिथचा काटा काढला.

त्यापूर्वी कालच्या चौथ्या दिवशी जाडेजाने डेव्हिड वॉर्नर आणि नाईट वॉचमन नॅथन लायनला तंबूत धाडलं होतं.

चौथ्या दिवसाचा खेळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी ठाकली. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली.

या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे.

भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं. पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.

संबंधित बातम्या

11 तास फलंदाजी, 500 चेंडू खेळणारा पुजारा एकमेव भारतीय!
रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी
पुजाराला बाद घोषित करण्यासाठी अम्पायरनं बोट वर केलं पण…
DRS मुळं रिद्धिमान साहाला जीवदान, ऑस्ट्रेलियन संघ नाराज  
First Published: Monday, 20 March 2017 11:28 AM

Related Stories

राहुल आणि पुजाराची टिच्चून फलंदाजी, उपहारापर्यंत भारत 1 बाद 64 धावा
राहुल आणि पुजाराची टिच्चून फलंदाजी, उपहारापर्यंत भारत 1 बाद 64 धावा

धर्मशाला : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील धर्मशाला कसोटीच्या

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव
82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

मुंबई : धर्मशाला कसोटीनंतर भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या

अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू
अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'
ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'

धर्मशाला : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या

टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!
टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!

शिमला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे

IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला
IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला

धर्मशाला : भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना

शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार
शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे

...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली
...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली

मुंबई : “जर मी 100 टक्के फिट असेन तरच खेळेन,” असं स्पष्टीकरण टीम

पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?
पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?

धर्मशाला: ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातली पुण्याची पहिली कसोटी