भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना, टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्याची संधी

श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आज भारताची बांगलादेशविरुद्ध लढत होणार आहे.

भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना, टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्याची संधी

कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेत आज भारताची बांगलादेशविरुद्ध लढत होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने जिंकून भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे.

आज बांगलादेशला हरवून मालिकेची फायनल गाठण्याची भारताला संधी असणार आहे. तर मालिकेतील आव्हान मजबूत करण्यासाठी बांगलादेशाला हा सामना जिंकणं गरजेच आहे.

या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा फारशी चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म ही भारतीय संघाची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी रोहित शर्मा आपला फॉर्म परत मिळवेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

पण बांगलादेशने आपल्या मागील सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशसमोर 215 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण मुशफकीर रहीमच्या 72 धावांच्या जोरावर बांगलादेशने हे आव्हान दोन चेंडू आणि पाच विकेट राखून पार केलं. या विजयामुळे सध्या बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्यांना कमी लेखण्याची चूक करता येणार नाही.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India vs Bangladesh t20 match in Colombo latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV