IND vs NZ : न्यूझीलंडचा 6 विकेट्स राखून विजय

या पराभवामुळे वन डे सामन्यांच्या क्रमवारीत पुन्हा नंबर वन होण्याची टीम इंडियाची संधी हुकली.

IND vs NZ : न्यूझीलंडचा 6 विकेट्स राखून विजय

मुंबई : न्यूझीलंडने मुंबईच्या पहिल्या वन डेत भारताचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे वन डे सामन्यांच्या क्रमवारीत पुन्हा नंबर वन होण्याची टीम इंडियाची संधी हुकली.

कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शतकाला यशाचा टिळाही लागू शकला नाही. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

या सामन्यात न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. पण लॅथमने नाबाद 103 धावांची खेळी उभारून न्यूझीलंडच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रॉस टेलरचं शतक पाच धावांनी हुकलं. त्याने 95 धावांची खेळी करून लॅथमला साथ दिली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Cricket India match new zealand odi one day international
First Published:
LiveTV