डरबन वनडेत भारताची द. आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीनं एक खिंड लढवून डरबनच्या पहिल्या वन डेत झुंजार शतक झळकावलं.

डरबन वनडेत भारताची द. आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात

डरबन : विराट कोहलीने झळकवलेलं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 33 वं शतक आणि अजिंक्य रहाणेच्या साथीनं त्याने रचलेली अभेद्य भागीदारी यांच्या जोरावर टीम इंडियानं डरबनच्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची दोन बाद 67 अशी अवस्था झाली होती. पण विराट आणि रहाणेनं तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

विराट कोहलीने 118 चेंडूंमध्ये दहा चौकारांसह 112 धावा ठोकल्या. हे त्याच्या कारकीर्दीतलं तेहतीसावं वनडे शतक ठरलं. रबाडाने कोहलीला झेलबाद केल्यानंतर धोनी मैदानात उतरला. अजिंक्य रहाणेनं पाच चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली

त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीने झुंजार शतक झळकावलं. 112 चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह 120 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत आठ बाद 269 धावांची मजल मारली होती.

भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवनं प्रभावी फिरकी मारा केला. चहलनं 45 धावांत दोन, तर कुलदीपनं 34 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India Vs South Africa Darban One Day latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV