सेन्चुरियनच्या वनडेत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेची दाणादाण

टीम इंडियानं सेन्चुरियनच्या दुसऱ्या वन डेत दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी अवघं 119 धावांचं लक्ष्य होतं.

सेन्चुरियनच्या वनडेत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेची दाणादाण

सेन्चुरियन : टीम इंडियानं सेन्चुरियनच्या दुसऱ्या वन डेत दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी अवघं 119 धावांचं लक्ष्य होतं.

शिखर धवन आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिखर धवननं नाबाद 51 धावांची, तर विराट कोहलीनं नाबाद 46 धावांची खेळी उभारली. त्याआधी भारताच्या यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव 118 धावांत गुंडाळला.

लेग स्पिनर चहलनं 22 धावांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी धाडला. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं वीस धावांत तीन विकेट्स घेतल्या.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: india won over south africa in centurion one day latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV