केपटाऊन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इतिहास रचला

भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 130 धावांमध्ये रोखून दमदार कामगिरी केली.

केपटाऊन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इतिहास रचला

केपटाऊन : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत 72 धावांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या कसोटीत भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 130 धावांमध्ये रोखून दमदार कामगिरी केली. शिवाय नव्या विक्रमाचीही नोंद केली.

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

यासोबत कसोटी क्रिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं, की जलद गोलंदाजांनी दोन्ही डावात कमीत कमी एक-एक विकेट घेतली. पहिल्या डावात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. फिरकीपटू आर. अश्विननेही एक विकेट घेतली होती.

गोलंदाजांनी सावरलं, मात्र फलंदाजांची दमछाक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 208 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावातील 77 धावांच्या पिछाडीमुळे, भारतासमोर 208 धावांचं लक्ष्य होतं.

आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मात्र फलंदाजांना 208 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयश आलं.

आफ्रिकेने आज दोन बाद 65 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र त्यांचा हुकमी फलंदाज हाशिम आमलाला मोहम्मद शमीने माघारी धाडून आफ्रिकेला गळती लावली. आमलाने 4 धावा केल्या. मग नाईट वॉचमन रबाडालाही शमीनेच बाद केलं.

त्यानंतर बुमराने कर्णधार ड्युप्लेसिला भोपळाही फोडू दिलं नाही, तर डिकॉकला अवघ्या 8 धावांवर माघारी धाडलं. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन डिव्हिलियर्सने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही.

डिव्हिलियर्सच्या रुपाने आफ्रिकेची दहावी विकेट गेली. डिव्हिलियर्सने 35 धावा केल्या. त्याला बुमराने भुवनेश्वरकरवी झेलबाद केलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Indian bowlers creates history in capetown
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV