ICC क्रमवारीत 'विराटराज', कोहलीसोबत मितालीही अव्वल

महिला फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राजनं दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर उडी मारली. तिच्या खात्यात सर्वाधिक 753 गुण आहेत.

ICC क्रमवारीत 'विराटराज', कोहलीसोबत मितालीही अव्वल

मुंबई : विराट कोहली आणि मिताली राज या भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या कर्णधारांनी वन डे फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे पुरुष आणि महिलांच्या आयसीसी क्रमवारीत एकाचवेळी दोन भारतीय 'नंबर वन' झाल्याचा योग जुळून आला आहे.

महिला फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राजनं दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर उडी मारली. तिच्या खात्यात सर्वाधिक 753 गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 725 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर न्यूझीलंडची अॅमी सॅटर्थवेट 720 गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

महिला गोलंदाजांमध्ये भारताची झुलन गोस्वामीने 652 गुण मिळवत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेची मारिझाने कॅप 656 गुणांसह अव्वल आहे.

रँकिंगमध्ये कोहली अव्वल, चर्चा मात्र बुमराच्या नंबरची!


भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण अवघ्या दहा दिवसांत डिव्हिलियर्सला पिछाडीवर टाकून, विराट पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला.

कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 263 धावांचा रतीब घातला. त्यामुळे विराटची एकूण कमाई ही 889 गुणांची झाली असून, सचिननं 1998 साली केलेली सर्वाधिक गुणकमाई ही 887 होती.

पहिल्या दहा जणांमध्ये कोहलीशिवाय एकमेव रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर तर महेंद्रसिंह धोनी अकराव्या स्थानी आहे.

वन डे गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा हसन अली 759 गुणांसह पहिल्या क्रमांकावर, तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर 743 गुणांसह दुसऱ्या क्रमांकवर आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Indian Captain Mithali Raj rises to top spot in ICC batswomen ranking latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV