कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये सिंधूला जेतेपद

ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. या पराभवाचा वचपा सिंधूने काढला आहे.

कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये सिंधूला जेतेपद

सेओल : भारताची शटलक्वीन पी.व्ही सिंधूनं कोरिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्याच्या थरारक लढाईत सिंधूनं जपानच्या नोझुमी ओकुहाराचा पराभव केला

22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

या सामन्यातील पहिला गेम सिंधूनं 22-20 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने आपला खेळ उंचावला आणि हा गेम 21-11 असा जिंकत बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या गेममध्ये सिंधूनं जोरदार पुनरागमन करत तो 21-18 असा खिशात घातला.

ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला आहे.

https://twitter.com/PBLIndiaLive/status/909310526903209984

सिंधूनं चीनच्या बिंगजियाओवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. सिंधूने बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV