DSP हरमनप्रीत कौर, टी-20 संघाची कर्णधार पंजाब पोलिसात!

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरमनप्रीत कौरच्या वर्दीवर स्टार लावले.

DSP हरमनप्रीत कौर, टी-20 संघाची कर्णधार पंजाब पोलिसात!

चंदीगड : भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आज म्हणजेच 1 मार्चपासून पंजाब पोलिसात रुजू झाली आहे. हरमनप्रीत कौरने पंजाब पोलिसात डीएसपी अर्थात पोलिस उपअधीक्षक पद स्वीकारलं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पोलिस महासंचालक सुरेश अरोरा उपस्थित होते.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरमनप्रीत कौरच्या वर्दीवर स्टार लावले. महिला विश्वचषक 2017 मध्ये शानदार कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात हरमनप्रीतला डीएसपी पदाची ऑफर दिली होती.हरमनप्रीतने पश्चिम रेल्वेमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून तीन वर्ष पूर्ण केले होते. तिने मागील वर्षी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला पदातून मुक्त केलं. कारण हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसात काम करायचं होतं.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही हे प्रकरण रेल्वे मंत्रालयासमोर उपस्थित केलं होतं. हरमनप्रीतला पदमुक्त करण्यासाठी तिच्या बॉण्डमधील शर्थी आणि अटींमध्ये सूट देण्याची विनंती केली होती.

खरंतर पंजाब पोलिसात डीएसपी पदासाठी तिची वैद्यकीय चाचणी आधीच पूर्ण झाली होती. पण भारतीय रेल्वेने तिला पदमुक्त केलं नव्हतं, त्यामुळे ती पंजाब पोलिसात रुजू झाली नव्हती.

परंतु भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला तिला पदातून मुक्त केल्यानंतरच हे शक्य झालं. एकेकाळी पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतला नोकरी देण्यास नकार दिला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV