कर्णधार मिताली राजच्या ड्रेसवरुन सोशल मीडियातून टीका

मितालीनं एका अॅड शूटला जाण्याआधी आपला स्लिव्हलेस ड्रेसमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावरुन तिला काही जणांनी ट्रोल करणंही सुरु केलं.

कर्णधार मिताली राजच्या ड्रेसवरुन सोशल मीडियातून टीका

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहोचवणारी कॅप्टन कूल मिताली राज नेटीझन्सची शिकार झाली आहे.

मितालीनं एका अॅड शूटला जाण्याआधी आपला स्लिव्हलेस ड्रेसमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावरुन तिला काही जणांनी ट्रोल करणंही सुरु केलं. ‘तू अभिनेत्री नाहीस त्यामुळे ग्लॅमरस बनण्याचा प्रयत्न करु नको.’ असा फुकाचा सल्लाही काही जणांनी दिला.क्रिकेट महिला संघाच्या यशस्वी वाटचालीबाबत संपूर्ण देशात त्यांचं कौतुक होत असताना दुसरीकडे काही संकुचित वृत्तीचे लोक त्यांच्या कपड्यावरुन त्यांना ट्रोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

gallery-image-3743764

याआधीही एकदा मितालीला तिच्या ड्रेसवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसात सोशल मीडियात ट्रोलिंगचं प्रमाण बरंच वाढत चाललं आहे. त्यामुळे अशा मानसिकेतचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV