आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक

मुंबई : बजरंग पुनियानं कोरियाच्या स्यून्गचुल लीवर 6-2 अशी गुणांवर मात करून, आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. मात्र महिलांच्या 58 किलो वजनी गटात भरताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत बजरंग पुनियानं पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 58 किलो वजनी गटात भारताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

किर्गिस्तानच्या एसुलू टायनीबेकोव्हानं सरितावर 6-0 असा निर्विवाद विजय मिळवला. त्यामुळं भारताच्या महिला पैलवानाला आणखी एका सुवर्णपदकाला मुकावं लागलं.

पण भारताच्या महिला पैलवानांनी चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई करून आजवरची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV