धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला.

धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

चेन्नई: भारताच्या महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत अर्धशतक झळकावून, आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अर्धशतकांचं शतक साजरं केलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला.

धोनीच्या नावावर कसोटीत 33, वन डेत 66 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत एक अशी मिळून 100 आंतरराष्ट्रीय अर्धशतकं आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक 164, राहुल द्रविडनं 146 आणि सौरव गांगुलीनं 107 अर्धशतकं फटकावली आहेत. धोनी आता त्या तिघांच्या पंक्तीत येऊन दाखल झाला आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

विराट कोहलीच्या टीम इंडियानं चेन्नईच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 282 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 21 षटकांत 164 धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. पण ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली.

भारतानं ऑस्ट्रेलियाला 21 षटकांत नऊ बाद 137 धावांत रोखलं.

भारताकडून यजुवेंद्र चहलनं तीन, कुलदीप यादवनं दोन, हार्दिक पंड्यानं दोन आणि जसप्रीत बुमरानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनीनं आधी हार्दिक पांड्या आणि मग भुवनेश्वर कुमारच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी भारताला 50 षटकांत सात बाद 281 धावांची मजल मारुन दिली.

त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ 87 धावांतच माघारी धाडला होता. पण पांड्या आणि धोनीनं रचलेल्या 118 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला स्थैर्य दिलं.

पांड्यानं 66 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावांची खेळी उभारली. धोनीनं 88 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 79 धावांची खेळी केली. धोनीनं भुवनेश्वर कुमारच्या साथीनं 72 धावांची भागीदारी रचली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV